पान:विधवाविवाह.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ला; ह्मणजे पराशरसंहिता कलियुगामध्ये विधवांच्या विवाहाचे विधान करते, आणि बहलारदीय व आदित्य ही पुराणे निषेध करतात. परंतु पराशरसंहिता ही स्मृति आहे आणि वृहन्नारदीय व आदित्य ही पुराणे आहेत. आणि स्मति व पुराणे यांचा परस्परांशी विरोध आल्यास पुराणे सोडून स्मृतींचेच अवलंबन करावे असे पुराणकर्त्यांचेच वच. न आहे. यावरून बृहन्नारदीय व आदित्यपुराणे कलियगां त विधवांच्या विवाहाचा निषेध करणारी असे असले तरी ती अगदी सोडून देऊन पराशरसहित विधवाविवाहाना विधि केला आहे त्याचाच अंगीकार आपण करावा.. विधवांचा विवाह आमच्या शास्त्रास संमत आहे हे या. वरून निर्विवाद सिद्ध झाले. परंतु आतां दुसरी हरकत अशी आहे की, विधवाविवाह शात्र संमत आहे तर रुदिविरुद्ध आहे, सबब तो करता कामा नये ही काम निवारण्याकरितां, रुढीचे प्रमाणत्वे करून अवलंबन करावे हे पाहिले पाहिजे. वसिष्ठाने आपल्या स्मतीमध्ये या गोष्टीचा उलगडा केला आहे. तो असाः लोके प्रेत्य वा विहितो धर्मः । तदलाभे शिष्टाचारः प्रमाणम् ॥ "इहलोकसंबंधी अथवा परलोकसंबंधी गोष्टींमध्ये शास्त्रविहित धर्माचे आचरण करावे. परंतु शास्त्रविधि नसल्यास रुढि प्रमाण धरावी." ह्मणजे शास्त्र प्रतिपादित धर्मांचे मनुष्यांनी आचरण करावें; आणि ज्या गोष्टींविषयी शास्त्रांत विधि नाही व निषेध ही नाही, पण ज्या आपले