पान:विधवाविवाह.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निर्णय आहे हे पाहिले पाहिजे. वेदव्यासाने आपल्या स्मतीमध्ये याचा उलगडा केला आहे. तो असाः श्रुतिस्मृतिपुराणानां विरोधो यत्रदृश्यते । तत्रश्रोतं प्रमाणंतु तयोर्दैधे स्मृतिर्वरा ॥ "वेद, स्मृति व पुराण यांचा परस्परांशी विरोध अस ल्यास वेद बलवत्तर; आणि स्मृति व पुराण यांचा परस्परांशी विरोध असल्यास स्मति बलवत्तर." हणजे वेदाज्ञा एकाप्रकारची, स्मृतींची आज्ञा दुसऱ्या प्रकारची आणि पुराणांची आज्ञा तिसऱ्याच प्रकारची असें असले तर काय करावे? प्रमाण कोणतें मानावें? मनुष्यास ती तीन्ही प्रमाणभूत आहेत; त्यांतून एकासच तो अनुसरला तर दुसऱ्या दोहोंची अवज्ञा होईल; आणि शास्त्राची अवज्ञा केल्यामुळे त्यास पातक लागेल अशी मोठी अडचण आहे. हिचे निवारण वेदव्यासाने असे केले आहे की, वेद. स्मति व पुराण एकमेकाशी विरुद्ध असल्यास स्मृति व पुराण यांच्या आज्ञा न मानतां वेदाज्ञे प्रमाणे वागावे; आणि स्माति व पुराण यांचा परस्पराशी विरोध असल्यास पुराणाची आज्ञा न मानतां स्मृतीच्या आज्ञेप्रमाणे वागावे. आतां पाहा, प्रथम बृहनारदीय व आदित्य या पुराणां. चे तात्पर्यवर्णन केले आहे, त्यावरून ती विधवांच्या विवाहाचा निषेध करणारी आहेत असे मुळीच होत नाही. दु. सरें, त्यांच्या अर्थाची ओढाताण करून ती निषेध कारकच आहेत असा आग्रह धरल्यास बृहन्नारदीय व आदित्य ही पुराणे आणि पराशरसंहिता यांच्या मध्ये उघड विरोध आ