पान:विधवाविवाह.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खरे, परंतु कलि युगांत त्या पुत्रास पौनर्भव शब्द लावावा न लावावा या विषयों में मागे लिहिले आहे त्यावरूनच पोनर्भव व औरस यांच्या मधली तफावत आतां उरली नाही असे सिद्ध झाले आहे. तेव्हां शास्त्ररीत्या विवाहित विधवेपासून झालेला पुत्र कलियुगांत पौनर्भव असा न मानितां औरस असाच मानिला तर मग औरस व दत्तक या दोघां खेरीज इतर पुत्रांच्या स्वीकाराचा जो कलियुगांत निषेध आहे त्यापासून कलियुगांत विधवांच्या विवाहाचा निषेध कसा सिद्ध होईल. बहनारदीयपुराण व आदित्यपुराण यांतील वचनें घेउन त्यांच्या तात्पर्याचा विचार वर केला आहे. त्यावरून ही कलियुगांत विधवाविवाहाचा निषेध करीत नाहीत की स्पष्ट दिसते. परंतु वरील विचारापासून निषेधवादी समाधान नहोतां ते वरील निषेधांवरून विधवांचा किंवा शास्त्र विरुद्ध आहे असे भांडतील तर पुढे लिहिल्याप्रमाणे विचार केला पाहिजे. तो असाः-विधवांच्या विवाहाचा शार संहितेत विधि केला आहे, परंतु बृहलारदीय व आदित्य या पुराणांत निषेध केला आहे. या दोहोंत बल के आधार कोणता? ह्मणजे विधवाविवाह पराशराच्या प्रमाणे शास्त्रसंमत मानावा किंवा बृहन्नारदीय व आदिया पुराणांतल्या निषेधांप्रमाणे शास्त्रविरुद्ध मानावा? या गोष्टीचा उलगडा होण्याकरितां, परस्परांस विरुद्ध ही दोन जातींची प्रमाणे असल्यास त्यांतून अमुक बलतर मानावयाचे याविषयी आमच्या शास्त्रकर्त्यांचा काय