पान:विधवाविवाह.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नी स्वेच्छे करून मरणाच्या निश्चयाने प्रायोपवेशनी बसणे; ह्या गोष्टी विचारी व महात्मे अशा पुरुषांनी लोकांच्या सं. रक्षणार्थ कलीच्या आरंभी कायद्याने बंद करून टाकल्या." यावचनांमध्ये ही विधवांच्या विवाहाचा निषेध करणारे वाक्य कोठे आढळत नाही. दिलेल्या कन्येचे दान पुनः करण्याविषयींचा निषेध विधवाविवाहाविषयी लावतां येत नाही, हे बृहन्नादीय पुराणांतील सजातीय वाक्याचा विचार करतेवेळी दाखवलेच आहे. औरस व दत्तक या दोन पुत्रांखेरीज इतरांच्या पुत्री करणाचा निषेध आदित्य पुराणांत आहे; त्यावरून विधवाविवाहाचा निषेध सिद्ध होतो असे काही लोकांचे ह्मणणे आहे. तो निषेध सिद्ध करण्याचा प्रकार, "विवाहित विधवेपासून झालेल्या पुत्रास पूर्वांच्या युगांत पौनर्भव असे ह्मणत असत. कलियुगांत औरस व दत्तक यां खेरीज इतर पुत्राचा स्वीकार करण्याचा निषेध आहे तो पौनर्भव पुत्रास ही लागू आहेच. आतां विवाहाचा हेतु पुत्र संतान व्हावे हा आहे. आणि विवाहित विधवेपासून झालेल्या पुत्राचा पुत्रत्वेकरून स्वीकार करण्यास निषेध आहे तेव्हां विधवेच्या विवाहाचा निषेध सिद्ध झालाच.' हे ह्मणणे आपाततः सयुक्तिक दिसते; आणि पराशर संहितेतील वचन नसते तर या युक्तीने विधवाविवाहाच्या निषेधाचे स्थापन झालें असते; परंतु ज्यांचे हे वरील बोलणे आहे त्यांनी पराशरसंहिता पाहिली नाही असे वाटते. विवाहित विधवेपासून झालेल्या पुत्रास पूर्वीच्या युगांत पौनर्भव ह्मणत होते