पान:विधवाविवाह.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ एका वरास वाचेने दिलेली कन्या, त्यापेक्षा चांगल्या गुणांचा दुसरा वर मिळाल्यास त्याला देण्याचा संप्रदाय पूर्वांच्या युगांत होता. याविषयों वचनः सकृत् प्रदीयते कन्या हरस्तां चौरदंडभाक् ॥ दत्तामपि हरेत् पूर्वात् श्रेयांश्चेद्वार आवजे । "कन्येचे दान करणे हे एकदांच; आणि एकदां दिल्यानंतर माघारी घेणारा चोराच्या दंडास पात्र होतो. पंरतु पूर्वीच्या वरापेक्षा दुसरा विशेष चांगला वर आला तर (त्यास देण्यासाठी) ही दिलेली कन्या परत घ्यावी." वाचादत्त झालेली कन्या दुसरा विशेष चांगला वर मिळाल्यास त्यास देण्याचा जो शास्त्रसंमत संप्रदाय पूर्वीच्या युगांत चालू होता त्याचा मात्र निषेध बृहन्नारदीय पुराणांत केला आहे. यास्तव या वचनाचा अर्थ ओढ़न ताणन कलियुगांत विधवाविवाह निषेधपर लावणे हे असंगत आहे. दुसरे, असे की, पराशरसंहितेत विधवाविवाहाचें स्पष्ट विधान केले असता त्याच्या विरुद्ध ह्या पुराण व. चनाचा अर्थ काढणे हे अगदी विरुद्ध आहे. आदित्य पुराण. दीर्घकालं ब्रह्मचर्य धारणंच कमंडलोः ।। देवरेण सुतोत्पत्तिर्दत्ता कन्या प्रदीयते ॥ कन्यानामसवर्णानां विवाहश्च द्विजातिभिः । आततायिद्विजाग्याणां धर्म्ययुद्धेन हिंसनम् ॥ वानप्रस्थाश्रमस्यापि प्रवेशो विधिदेशितः । याज्ञवल्क्य संहिता, अध्याय १.