पान:विधवाविवाह.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांगितलेल्या प्रकारच्या पुत्रास पौनर्भव हेच नांव देणे त्यास विवक्षित असते तर त्याने कलियुगांत निरनिराळ्या प्रकारचे कायदेशीर पुत्र सांगितले त्यांत त्याचे ही परिगणन खचीत केले असते. परंतु सगळ्या पराशर सहितेत पौनर्भव शब्द मुळीच आढळत नाही. यावरून स्वजातीय विधवेशी विवाह करणारास तिजपासून जो पुत्र होईल त्यास पौनर्भव असें न मानतां औरसच मानले पाहिजे वरील प्रमाणांवरून कलियुगांत विधवाविवाह शास्त्रसंमत आहे हे सिद्ध झाले. आतां पराशरसंहिते खेरीज धर्मशास्त्राच्या दुसऱ्या एखाद्या ग्रंथांत कलियुगांत विधवा विवाहाचा विषयी निषेध केला आहे की काय हे पाहिले पाहिजे. कारण, पुष्कळांचे ह्मणणे असे आहे की, पूर्वीच्या युगांत विधवाविवाह प्रचारांत होता ; परंतु कलियुगांत तो निषिद्ध केला आहे. तर कलियुगासच लागू असे जे धम तेच पराशरसंहितेत सांगितले आहेत आणि त्याच धमांत विधवाविवाहाचा संग्रह स्पष्ट रीतीने केला आहे. या स्तव कलियुगांत विधवांस विवाहाचा निषेध आहे असे स्थापन करितां येत नाही असे आहे; तेव्हां आतां विधवाविवाह न करण्या विषयी काय सबल प्रमाण असेल ते एक निषेधवादीसच माहीत असेल दुसऱ्या कोणास नाहीं स्मार्तभट्टाचार्य रघुनंदन याने विवाहावरील निबंधांत बृहन्नारदीयपुराण व आदित्यपुराण यांतून घेतलेली वचने कलियुगांत विधवाविवाहाचा निषेध करणारी आहेत असे