पान:विधवाविवाह.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" पुत्राच्या धर्माने युक्त व गुणदोष जाणणाऱ्या अ. शा मुलाचे, एखाद्या सजातीय पुरुषाने पुत्राप्रमाणे ममतेने पालन पोषण केले असतां तो पुत्र (त्या पालन करणाऱ्याचा) कृत्रिम होय. स्वक्षेत्रे संस्कृतायान्तु स्वयमुत्पादयेद्धियम् । तमोरसं विजानीयात पुत्रं प्रथमकल्पितम् ॥ "कोणा एकाचा स्वजातीच्या स्त्रीशी विवाह होऊन त्यासच त्या स्त्री पासून जो पुत्र होतो तो त्या मनुष्याचा औरस (स्वशरीरापासून निर्माण झालेला ) पुत्र होय. हा पहि ल्या प्रतीचा पुत्र होय." हे वरील वचन रूप लक्षण, स्वजातीच्या विधवेशी विवाह केल्यावर तिजपासन स्वतः त्या विवाह करणाऱ्यास जो पुत्र होईल त्यास पूर्णपणे लागू हातें. पराशर संहितेत विधवाविवाहाचे विधान केले आहे. आणि बारा प्रकारच्या पुत्रांतून कलियुगांत तीन प्रकारचेच पुत्र कायदेशीर ह्मणून सांगितले आहेत; त्यांपैकी दलक व कृत्रिम या दोघांची वरील लक्षणे, स्वजातीच्या विधवेशी लग्न करणारास तिजपासून झालेल्या पुत्रास मुळीच लाग होत नाहीत व औरस पुत्राचेच लक्षण पूर्णपणे लाग होते. या सर्व कारणांवरून त्यास औरस पुत्र लणण्यास आम्हास, पक्का आधार आहे. पूर्वीच्या युगांत पौनर्भव हणन एवं प्रकारचा पुत्र होताच; तोच पौनर्मव शब्द विवाहित विधवे पासून झालेल्या पुत्रास लावण्याचा पराशराचा अभिप्राय असेल, असेंतर लणतांच येत नाही. कारण, कलियुगांत वर