पान:विधवाविवाह.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

थी तिजपासून पुढे झालेला पुत्र यथाशास्त्र म्हणजे कायदेशीर वारस आहे असें ध्वनित करतो. आतां या पुत्रास म्हणावे काय? औरस, किंवा दत्तक, किंवा कृत्रिम अशी शंका आहे. त्यांपैकी यास दत्तक अथवा कृत्रिम या दोहोंतून एकही म्हणता येत नाही. कारण, दसऱ्या मनष्याचा मुलगा शास्त्रोक्त विधीप्रमाणे पोष्णा घेतला असतां त्याविधीच्या दोनरीतींच्या अनुष्ठानांप्रमाणे त्यास दत्तक आणि कृत्रिम अशा दोन संज्ञा आहेत. परंतु विधवेशी विवाह केल्यावर तिजपासून त्याविवाह करणारासच जो स्वतः पत्र झाला तो दुसन्या मनुष्याचा नव्हे ; यास्तव वरील संज्ञांपैकी त्यास एकही लागू नाही. दत्तक (दिलेला) आणि कृत्रिम (केलेला) यांची स्मृतीत सांगितलेली लक्षणे, मकाने विधवेशी पुनर्विवाह केल्या नंतर तिजपासन त्यास झालेल्या. पुत्रास लावता येत नाहीत; तर त्यास औरस (पोटी झालेल्या) पुत्राचेंच लक्षण लागू होते असें खालच्या स्मृती वरून स्पष्ट दिसते: माता पिता वा दद्यातां यमद्भिः पुत्रमापदि । सदृशं प्रीतिसंयुक्तं स ज्ञेयो दस्त्रिमःसुतः ॥ आईने अथवा बापाने, ज्यास पुत्र नाही, अशा सजातीय मनष्यास शास्त्रविधीने संतोष करून दिलेला जो पुत्र तो (त्या घेणाराचा) दत्तक होय.) सदृशन्तु प्रकुर्यादं गुणदोषविचक्षणम् । पुत्रं पुत्रगुणैर्युक्तं स विज्ञयस्तु कृत्रिमः ॥