पान:विधवाविवाह.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंतःकरणांत उमजनच जगद्वितका पराशर ऋषीने प्रथम प्रकार विवाहाचाच सांगितला. अस्तु, हंशील इत केंच समजावयाचें की, कलियुगांत या पांच प्रकारच्या अडचणी आल्या असतां स्त्रीने विवाह करावा असा धर्म पराशर सांगतो, त्या अर्थी कलियुगांत विधवाविवाह शास्त्र संमत आहे. कलियुगांत विधवाविवाह सशास्त्र आहे हे सिद्ध झाल्या नंतर आतां विधवेस पुनर्विवाहोतर झालेल्या मुलास पिौनर्भव म्हणावे किंवा नाही या गोष्ठीचा निर्णय पराशर संहितेतच केला आहे. पुर्वांच्या युगांत निरनिराळे बारा प्रकारचे पुत्र धर्मशास्त्रांत अधिकारी सांगितले आहेत परंतु कलियुगांत पराशराने त्यांपैकी तीन ठेवून बाकीचे रद केले. तीन ठेविले तेः । औरसःक्षेत्रनश्चैव दत्तः कृत्रिमकः सुतः। "औरस, दत्तक आणि कृत्रिम." याप्रमाणे कलियुगांत पराशराने तीन प्रकारचे पुत्र सांगितले. एक औरस ह्मणजे पोटी झालेला, एक दत्तक म्हणजे मांडीवर पोष्णा घेतलेला आणि एक कृत्रिम म्हणजे कृतीने केलेला. तो पौनर्भवाचे ग्रहणच करित नाही. पण ज्या अर्थी तो विधवाविवाहाचे विधान करतो त्यां अ +दुस-याने विवाह केलेल्या स्त्रीपासून झालेला पुत्र. प्राचीन युगात पौनर्भवयास कमी प्रतीचा पुत्र मानीत असत.

  • मूल वाक्यांत चार प्रकारचे पुत्र सांगितले आहेत. परंतु दत्तकमीमांसेत नंद पंडित यांनी या वाक्याची व्याख्या करून कलियुगांत औरस, दत्तक आणि कृत्रिम असे तीनच पुत्र आहेत असें स्थापन केले आहे त्याचेच अनुसरण येथे केले आहे.