पान:विधवाविवाह.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यावरून कलियुगांत धर्म व आचार यांचे निर्णायक शास्त्र पराशरसंहिता हीच होय या विषयों तिलप्राय सं. शय उरला नाही. आतां या संहितेच्या चवथ्या आध्यायांत विधवांस धर्म व आचार सांगितले आहेत ते असेः नष्टे मृते प्रव्रजिते क्लीबे च पतिते पतौ । पञ्चस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते ॥ मते अतरिया नारी ब्रह्मचर्ये व्यवस्थिता। सा मता लभते स्वर्ग यथा ते ब्रह्मचारिणः ।। तिवः कोटया कोटी च यानि लोमानि मानवे । तावत् कालं वसेत् स्वर्ग भर्तारं यानुगच्छति ॥ "पतीचा पत्ता लागेनासा झाला, पति मत्यु पावला, सन्यस्त झाला, नपुसक निपजला, अथवा पतित झाला तर या पांचही प्रसंगी स्त्रीने अन्य पति वरावा. जी स्त्री पति मेल्यानंतर ब्रह्मचर्यव्रताने राहते तिला ब्रह्मचाऱ्या प्रमाणेच स्वर्गसुख प्राप्त होते. पतीच्या मरणानंतर त्याज बरोबर सती जाणारी स्त्री मनुष्याच्या शरीरावर साडेतीन कोट केस आहेत तितका काळ पावेतों ( म्हणजे कोट्यावधि 'र्षे ) स्वर्गवास करिते." (याप्रमाणे विधवेस विवाह, ब्रह्मचर्य व्रत अथवा सहगमन असे तीन प्रकारचे धर्म पराशराने सांगितले आहेत. त्यां पैकी सहगमनाची चाल तर प्रस्ततच्या सरकारच्या हुकमाने बंदच झाली, तेव्हां अर्थात विधवेस विवाह करणे अथवा ब्रह्मचर्याने राहणे हे दोनच मार्ग राहिले. परंतु कलियुगांत ब्रह्मचर्याने राहणे हे विधवांस अत्यंत कठिण, हे.