पान:विधवाविवाह.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पिता पराशर याची प्रार्थना केली पाहिजे. नंतर सर्व ऋषि पराशराच्या आश्रमाप्रत व्यासासहवर्तमान गेले, आणि हात जोडून प्रदक्षिण नमस्कार करून त्यांनी पराशराची स्तुति केली. पराशराने संतुष्ट होऊन त्यांचा आदर सत्कार करून त्यांस कुशलप्रश्न केले; त्यावरून त्यांनी कुशल आहों अशी ऊत्तरे दिली. नंतर व्यास म्हणाला, हे तात, सत्य, त्रेता, द्वापार या युगांचे मन्वा दि. कांनी सांगितलेले विशेष धर्म मी तुज पासून ऐकले आहे. त. ते मी विसरलो नाही. सत्य युगांत सर्व धर्म उत्पन्न झाले व कलियुगांत ते सर्व नष्ट झाले. तेव्हां आतां ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारी वर्णांचे अगदी साधारण धर्म कोणते तेवढे सांग. याप्रमाणे व्यासाचे भाषण संपल्यावर पराशर विस्तार करून धर्म सांगू लागला" पराशरसंहितेच्या दुस-या अध्यायाच्या प्रारंभी हो कलियगांतलेच विशेष धर्म सांगण्याविषयी पराशराचा नि श्चय स्पष्ट दिसतो. तो असाः अतःपरं गृहस्थस्य धर्माचारं कलौयुगे। धर्म साधारणं शक्यं चातुर्वण्याश्रमागतम् ॥ संप्रवक्ष्याम्यहं पूर्व पराशरवचो यथा ॥ "गृहस्थ ( म्हणजे गृहस्थाश्रमी ) याने कलियुगांत कोणते धर्म व कोणते आचार करावे हे आतां मी सांगतो चार वर्णांतल्या व चार आश्रमांतल्या लोकानी आचरावयास शक्य जे साधारण धर्म ते मी पराशर याने प्राचीन काळी जसे सांगितले तसे आतां सांगतो."