पान:विधवाविवाह.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

8 वरून विधवाविवाह जर या शास्त्रांस संमत असेल तर त्याचा अंगीकार केला जाईल, आणि नसेल तर परित्याग के. ला जाईल. सर्व धर्मशास्त्रांत सांगितलेले धर्म सर्व युगांत आचरावे किंवा युगभेदें करून त्यांची काही व्यवस्था आहे, या विषयों मनु स्मृति पुढे लिहिल्या प्रमाणे आहे: अन्येकृतयुगे धर्मास्त्रेतायां द्वापरेऽपरे । अन्येकलियुगे नृणां युगहासानुरूपतः॥ "कृतयुगापासून कलियुगापर्यंत मनुष्याची शक्ति कमी कमी होत जाते; तिच्या प्रमाणान कृतयुगांतले धर्म निराळे, त्रेतायुगांतले निराळे, द्वापारयुगांतले निराळे आणि कलियगांतले निराळे." ह्मणजे पूर्वीच्या तीन युगांतल्या लोकांनी जे धर्म आच. रले ते या कलियुगांतल्या लोकांच्याने आचरवत नाहीत: कारण, मनुष्याच्या शक्तीचा दरएक उत्तरोत्तर युगांत क्षय होतो. त्रेतायुगांतल्या लोकांस सैंत्य युगांतले धर्म आचर ण्यास शक्ति नव्हती, द्वापारयुगांतल्यांस सत्य युगांतले व त्रेतायुगांतले धर्म आचरण्याची शक्ति नव्हती, आणि कलियुगांतल्यांस सत्य, त्रेता आणि द्वापार या तिन्ही युगांतले धर्म आचरण्यास शक्ति नाही. यावरून स्पष्ट दिसते की, कलियुगांतील लोक पूर्वांच्या तीन युगांतले धर्म आचरण्यास असमर्थ आहेत. तर आतां कलियुगांतल्या लोकांनी धर्म कोणते आचरावे? मनने * कृतयुग आणि सत्ययुग हे पर्यायशब्द आहेत.