पान:विधवाविवाह.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न तिज प्रमाणे त्या करणे हे आमचे लोक कधीच मान्य करणार नाहीत. तर त्या संप्रदायास धर्मशास्त्राधारच असला पाहिजे. कारण, हिंदु लोकांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टीस बलवत्तर आधार धर्मशास्त्रच होय. आणि धर्मशास्त्र संमत ज्या गोष्टी आहेत त्याच प्रशस्त अशा मानिल्या आहेत. तेव्हां विधवाविवाह धर्मशास्त्रास संमत आहे की असंमत आहे याचा निर्णय अधी केला पाहिजे. धर्मशास्त्र असे कोण कोणाच्या ग्रंथात ह्मणावे या विष. यों याज्ञवल्क्य संहितेच्या प्रथम अध्यायांत सांगितले आहे. तें या प्रमाणे: मन्वत्रिविष्णुहारीत याज्ञवल्क्योशनोऽङ्गिराः। यमापस्तम्बसंवाः कात्यायनबृहस्पती॥ पराशरव्यासशंखलिखिता दक्षगोतमौ । शातातपोवसिष्ठश्च धर्मशास्त्रप्रयोजकाः ॥ "मनु, अत्रि, विष्णु, हारोत, याज्ञवल्क्य, उशना, अंगिरा, यम, आपस्तंब, संवत, कात्यायन, बृहस्पात, पराशर, व्यास, शंख, लिखित, दक्ष, गोतम, शातातप आणि वसिष्ठ हे धर्मशास्त्रग्रंथकर्ते होत." या ऋषींनी केलेल्या शास्त्रास धर्मशास्त्र हँणावे. हिंदुलोक या शास्त्रांत जे धर्म सांगितले आहेत ते मानतात. आणि कोणती ही गोष्ट या शास्त्रांस संमत असल्यास ती प्रशस्त आणि संमत नसल्यास अप्रशस्त असे मानतात. या

  • यां खेरीज नारद, बोधायन व आणखी दुसरे चौदा ऋषि यांनी केलेल्या शास्त्रासही धर्मशास्त्र झणतात.