पान:विधवाविवाह.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क्षां पैकी प्रत्येक पक्षाच्या लोकांनी आमचा जय झाला व विरुद्ध पक्षाचा पराजय झाला असे मानिले. यावरून त्या विचारांत निर्णय काय झाला असावा हे सहजच समजते. ह्मणजे विचायाँशाचें कांहींच झाले नाही. तथापि यापासून एक कार्य मोठे झाले की, त्या वेळेपासून वंगाल्यांतल्या पुष्कळ लोकांस या गोष्टीचा निर्णय काय तो आपणास कळावा या विषयी अतिशयित उत्कंठा झाली. ही उत्कंटा पाहून या ग्रंथाचा मळ कर्ता, ईश्वरचंद्र विद्यासागर कलकत्यांतील एक पंडित, हा विधवाविवाहा विषयी साध. क बाधक विचार करू लागला आणि त्या विचारापासून जें हशील निष्पन्न झाले ते त्याने बंगाली व इंग्रजी या भाषांत छापून प्रसिद्ध केले. त्यां पैकी इंग्रजी भाषेतल्या अं. थाचा हा मराठी तर्जुमा करून लोकांस सादर केला आहे. तर हा आतां निष्पक्षपात अंतःकरणाने साद्यंत वाचून मग विधवाविवाह करण्याचा सांप्रदाय चालू करणे प्रशस्त आहे किंवा नाही याचा हिंदु लोकांनी निर्णय करावा. आज हजारो वर्षांत विधवाविवाहाचा संप्रदाय चालू नाही, तेव्हां आतां तो पाडणे ह्मणजे केवळ नूतन गोष्ट आ हे; त्यापक्षी हा संप्रदाय प्रशस्त आहे असे सप्रमाण दाखवा ले पाहिजे. कारण, तसे नसल्यास धर्मावर श्रद्धा ठवगार लोक तो पाडण्यास संमति देणार नाहीत. यास्तव मा. दर या संप्रदायाचे प्राशस्त्य सिद्ध केले पाहिजे, पाते केवळ युक्तीने सिद्ध करून काय फळ ? धर्म संबंधी गोंस धर्मशास्त्राधार असल्या शिवाय केवळ युक्ति लागू