पान:विधवाविवाह.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंद विधवांचा विवाह. विधवांचा विवाह न करण्याच्या चालीपासून जे अनेक प्रकारचे अनर्थ घडतात त्यांविषयों पुष्कळ हिंदु लोकांची पक्की खातरी झाली आहे. काही लोक आपल्या विधवा झालेल्या कन्या, बहिणी वगैरे स्त्रियांस विवाह करून देण्यास आज तयार आहेत; आणि कितीएक इतपत तयार नाहोत; पण ते विधवांचा विवाह व्हावा ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे खरी, असें तरी मान्य करतात. विधवाविवाह हा आमच्या शास्त्रास संमत आहे किंवा नाही या गोष्टीचा विचार, काही दिवसांपूर्वी बंगालच्या कांही मुख्य मुख्य पंडित लोकांनी केला. परंतु या हिंदु. स्थान देशांतील आधुनिक पंडितांचा असा काही चमत्कारिक सांप्रदाय पडून गेला आहे, की ते कोणत्या एखाद्या विषयावर वादविवाद करूं लागले असतां स्वपक्ष स्थापन करून जय मिळवण्या विषयी इतके अभिमानास पेटतात, की त्या विषयांतला वास्तविक विचार्यांश सर्वथैव सोडून देतात; यामुळे पंडितांची सभा भरवून एखाद्या विषयांतील सन्यांशाचा निर्णय करूं असें जर मनांत आणिले तर ते होण्याची आशा नाही. विधवाविवाह शास्त्र संमत आहे किंवा नाही याविषयी बंगालच्या पंडितांनी विचार केला लवान मागे लिहिले; त्या विचारांत असे झाले की, दोन प