पान:विधवाविवाह.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५१ अथवा वालहत्येच्या कामांत पुढारी होऊन सक्त मेहनत क रितां. बरे, तुही विचार करा की, आपल्या शास्त्राच्या आज्ञाप्रमाणे चालून त्यांची पुनः लग्ने करावी, त्यांस असह्य दुःखांतून बाहेर काढावे आणि स्वतः आपणास ही अनेक प्र. कारच्या दुःखांपासून व पातकांपासून दूर राखावे हे करण्यास तुली इतके नाखष आहां तेव्हां केवढे हे महदाश्चर्य !! तुलास कदाचित असे वाटत असेल की, मनुष्यस्वभावास धरून असणारे जे कामादि विकार ते पतींच्या मरणा बरोबरच स्त्रि. यांच्या मनापासून नाहीसे होतात ; पण असे असले तर प्रत्यही तुमच्या दृष्टी पुढे जी असंख्य उलट उदाहरणे घडत आहेत त्यांवरून ही तुमची चूक आहे असे तुह्मास सहज समजावें. अरेरे ! कल्पवृक्षासमीप बसून, फक्त डोळे उघडून विचार न केल्यामुळे त्याची अमृतमय फळें न तोडतां धडधडीत विषवृक्षाची फळे तोडतां, तेव्हां तुह्मास आता काय ह्मणावें, आणि या तुमच्या अविचाराबद्दल खेद तरी किती करावा! ज्या ठिकाणी पुरुषांस तिळमात्र दया नाही व करुणा नाही ज्या ठिकाणी खरे खोटें व बरे वाईट हे त्यांस कांही समजत नाही, ज्या ठिकाणी लोकांतल्या चाली व रीतिभाती ह्या राखणे हेच काय ते आपले उत्कृष्ट कर्त्तव्य कर्म, हाच आपला परम धर्म, व हीच आपली सुनीति, असें पुरुष समजतात त्या ठिकाणी स्त्रिया जन्मासच न याव्या हे फारच उत्तम. पण हे कसे होईल. हे अबले, अनाथ स्त्रिये, हिंदुस्थानांत तुझ्या दुःखास बिलकूल पारावारच नाही!