पान:विधवाविवाह.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५० हत्या इत्यादि दुराचरणांच्या नद्यांचे मोठाले प्रवाहच वाहत आहेत ते पहा. या प्रकरणी तुमच्या निकृष्टावस्थेची सीमाच होऊन गेली आहे. मी तुह्मास भलतें सलते काही करण्यास सांगत नाही. तुह्मी फक्त आपल्या शास्त्रावर लक्ष देऊन त्यांतील मर्म उमजा, हणजे तुमच्या या नामांकित देशाच्या तोंडास लागलेला कलंक तुह्मास घालवता येईल. परंतु अरेरे, अंधपरंपरेने चालत आलेल्या वेड्या चालींचा दुष्ट अंमल तलावर फार जारी आहे. केवळ लोकांतले रिवाज व रीति भाती यांचे तुझी अगदी दासच बनून राहिला आहां, यावरून तुह्मी सन्मार्गास लवकर लागाल की नाही आणि तुमची गमावलेली अब्रू तुली पुनः लवकर मिळवाल की नाही असा मोठा संशय वाटतो आणि अंतःकरणास अतिशय खिन्नता उत्पन्न होते. अनाथ विधवांस दुःख सागरांत लोटून त्यांचे हाल पाहण्याचा अभ्यास तुह्मास रात्रंदिवस पडल्यामुळे तुम. ची कुशाग्रबाद्ध आणि दयादिक उत्तम मनोविकार यांस इतकें मांद्य आले आहे की, त्या विचाऱ्यांच्या दुःखाविषयों तुमच्या मनात विचार उपजणे ह्मणजे बहुतेक असंभाव्यच झाले आहे. त्या बिचाऱ्यांच्या पाठीवर मदनाच्या चाबकांचा सपाटा उडतो वेव्हां त्या सहजच आपल्या ब्रह्मचर्याचा भंग करून मद. नाने दाखवलेला मार्ग धरतात आणि तुह्मी ही त्यांच्या त्या आचरणाविषयों अगदी डोळेझांक करितां आणि मग तुमच्या मनांतून तुमची नीति व तुमचा धर्म हे नष्ट होऊन केवळ लोकांत बभ्रा नव्हावा ह्मणन तही त्यांच्या गर्भपाताच्या