पान:विधवाविवाह.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४९ आमच्या धर्मशास्त्रावर तरी काय हे अरिष्ट आले आहे ! त्याची खरी आज्ञा कोणी मानीत नाही. ज्या आचरणांच्या योगाने मनुष्य धर्मभ्रष्ट व केवळ पतित होतो असे प्रत्यक्ष शास्त्रांत वारंवार सांगितले आहे तशा आचरणांत जे लोक जन्माचे जन्म घालवितात ते धर्मिष्ठ, आचारसंपन्न - णून मानले जातात. वस्तुतः शास्त्रांत काय आहे आणि काय नाही याचा विचार बिलकूल न करितां केवळ लौकिक चालींवर लक्ष देऊन त्यांज प्रमाणे जपून चालणे हा महान दुराचार आहे. आणि पूर्वी एकेकाळी सदाचार संपल जो हा आमचा प्रिय देश तोच आज आमच्या प्रबल दुर्भाग्यामुळे याच दुराचाराने ओतप्रोत भरून गेला आहे ! हरहर! हिंदुस्थानच्या स्त्रियांस प्रस्तुतचे दिवस काय दु:खाचे आले आहेत! याच भूमीतील लोकांचा आचार विचारा विषयी सर्व देशांत मोठा डंका गाजत होताना? आणि आतां तीच भूमि कितीएक दुराचारांनी अगदी भरून गेली आहे असे तेच देश मानतात, हे पाहून अंतःकरण अगदी फुटन जाते. या देशाच्या हल्लीच्या निकृष्ट दशेवरून आणि लोकांच्या अविचाराच्या व दुराग्रहाच्या आचरणावरून पाहतां याची सुधारणा त्वरित होईल असे लक्षण दिसत नाही. अहो बांधवहो ! अहो मित्र हो ! तुझी आतां या भ्रांतीमध्ये कोठवर राहणार! एकवेळ नेत्र उघडा, आणि सदाचरण व पातिव्रत्य या सद्गुणांचे अधिष्ठान ह्मणून प्रसिद्ध में तुमचे आवडतें हिंदुस्थान त्यांत व्याभिचार, भ्रूणहत्या, बाल