पान:विधवाविवाह.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ झाला आहे. चाल हिचा अधिकार सर्व अधिकारांत वरिष्ठ मानला आहे. चाल हिने जो अज्ञा केली तो शिरसावंद्य झाली आहे. हे चालो, तू एक मोठी कुलस्वामिनी देवीच होऊन बसली आहेस! तुझा अंमल इतका जलाल आहे की, त्याविषयों बोलण्याची सोयच नाही! तुझ्या भक्तांवर तुझी सत्ता किती अतोनात चालते! तूं शास्त्रे तर अगदी पादाक्रांत करून टाकली; सद्गुण समूळ पालथा घातला, खरें कोणते खोटें कोणते, बरे कोणते वाईट कोणते, हे जाणणाऱ्या शक्तीच्या मसक्या बांधून ती रसातळी नेऊन टाकली. तुझ्या अमलाची सदी अशी काही चमत्कारिक आहे की, ज्या गोष्टी माह था शास्त्रविरुद्ध आहेत त्या तुझे भक्त अत्यंत मान्य करिता. त, व ज्या शास्त्रांस अनुसरून आहेत त्यांचा ते प्रसिद्धपणे तिरस्कार करितात. ज्या लोकांस धर्म ह्मणजे काय, आणि अधर्म ह्मणजे काय, या गोष्टीचें तिलप्राय ज्ञान नाही व ज्यांस आपल्या बऱ्या वाईट आचरणा बद्दल बालाय काळजी नाही, असे लोक फक्त तुझ्या अद्भुत सामर्थ्या मुळे, जगांत धर्मिष्ट व सद्गुणी असे मानले जाऊन मोठा सन्मान पावतात. का. रण, ते तुझे ( चालीचे ) पूर्ण गुलाम आहेत आणि जे वास्तविकच धर्मिष्ठ व सद्गुणी आहेत व ज्यांचे आचरण अगदी निष्कलंक आहे अशांनी ही जर तुझी कांही अवज्ञा केली तर त्यांस भ्रष्ट, नीच, अविचारी, नास्तिक असे लोक मानतात.