पान:विधवाविवाह.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४७ तर सर्व लोकांचा त्या गोष्टींपासून कांही फायदा झाला नसता व नुकसान ही झाले नसते. या प्रमाणेच जिनगर लोकांची जानवी वगैरेच्या गोष्टी आहेत. परंतु विधवाविवाहाची चाल चालू नसल्या पासून हा सर्व देश किती जबर्दस्त दुखें व अडचणी भोगीत आहे! ही चाल नसल्यामुळे खरोखर इतके दुःख होत आहे की, त्याची वास्तविक कल्पना देखील करता येत नाही. आतां पाहा, फक्त थोड्याशा सोयींकरतां जर नवीन चालींचा आदर आपण करितो तर विधवांच्या विवाहाविषयी आपले शास्त्र आपणास वास्तविक रीत्या अनुकूल असल्यावर त्यांच्या भयंकर दुःखांच्या परिहाराकरितां आपण कोणत्या पाहिजे त्या नवीन चालींचा आदर निःशंकपणे मोठया आनंदाने करावा. । परंतु ही गोष्ट अत्यंत दुःखास्पद आहे की, आपणांपै. की कितीएक लोक विधवाविवाहाच्या बाबतीत, " चाल" किंवा " रूढि " हा शब्दच कानी पडला की तिजमध्ये काही फेरफार करण्याचा विचार करणे, हेच पातकाचे काम आहे असे मानतात. कितीएक लोकांच्या अंतः करणांत विधवाविवाहाची चाल सुरू व्हावी असे आहे; परंतु ती सुरू कराती असे शब्द तोडांतून बाहेर काढण्याची छातीच त्यांस नाही. कारण, तो विवाह देश चालीच्या विरुद्ध आहे. अरे ! केवढी दुःखाची गोष्ट ही ! चाल ही कतु अकर्तुं अन्यथा कर्तुं समर्थ अशी एक महाराणाच होऊन बसली आहे ! चाल हाच आमचा प्रमुख गुरु