पान:विधवाविवाह.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४६ याप्रमाणेच या देशांत स्त्रीशिक्षणाविषयीं ही धर्मशास्त्रदृष्टया निषेध आहे असे किती एक अल्प विचारी मन ज्यांचे मत काही दिवसांपूर्वी प्रबल होते; परंतु ईश्वरकृपेंकरून ते फार त्वरित क्षीण होत अमन उत्तम वर्णांच्या मुलींच्या झुंडी सर्व ठिकाणच्या स्त्रीशाळांमध्ये येऊन भरू लागल्या आहेत. आणि स्त्रियांच्या लग्नाच्या काळामध्ये "ब्राह्मणकन्याविवाहविचार" कर्त्याच्या सचने प्रमाणे थोडासा फेरफार झाला ह्मणजे मोठाल्या शाळांची कामें स्वतंत्र रीतीने चाल. विण्यासारख्या विद्वान व कुशल अशा स्त्रिया लवकरच तयार होतील यांत संशय नाही. ही स्त्रियांस शिकवण्याची चाल अगदी नवी नव्हे काय ? या नव्या चालीपैकी लोकांनी काही स्वेच्छेने व होसेने काढल्या आहेत आणि काही मूळच्या वचनांच्या नवीन व्याख्या करून तदनुसार पाडल्या आहेत. यांजवांचून सर्व लोकांचे मणजे कांहीं आडले होते किंवा त्यांस मोठी एखादी नड येऊन पडली होती असे तर मुळीच नाही. तर काही थोड्याशा लोकांस त्यांजपासून सोय झाली किंवा त्यांच्या समजुतींप्रमाणे त्यांस त्या बऱ्या वाटल्या. कारण, वरील वैद्यांनी आपला अशौच काळ कमी केला नसता, किंवा त्यांनी जानवों घातली नसती, किंवा पांच वर्षांहून अधिक वयाचे मुलगे दत्तक घेतले नसते