पान:विधवाविवाह.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४३ अगदी आलीकडच्या काळांत देखील आमच्या अनेक चालींत फरक पडलेला आहे. बंगाल्यांत वैद्यजातीतल्या लोकांनी राजा राजवल्लभ याच्या वेळेपासून आलीकडे, अशौचकालाची मर्यादा पूर्वीपेक्षा कमीकरून ती पंधरा दिवसांची केली आहे व जानवी घालण्याची नवी चाल पाडली आहे. त्याच्या वेळेच्या पूर्वी त्या लोकांत अशाचकालाची मर्यादा एक महिन्याची होती व जानवों घालण्याची चाल नव्हती. आणि या प्राचीन चालींप्रमाणे चालणारी घराणी वैद्यांमध्ये अजूनही आहेत. तर आतां या नव्या चाली घालणारे व त्यांचे वंशज यांस निंद्य मानून कोणों जातिबहिष्कृत केले आहे काय? दुसरे असे की, दत्तक चंद्रिका ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वी सर्व हिंदू लोकांत दत्तक पुत्र घेणे . तो, यथाशास्त्र दत्तविधान व्हावे ह्मणून, पांचवर्षांच्या आं. तल्या वयाचा घेऊन घेणारास त्याचे चूडाकरण करावें लागत असे. तो ग्रंथ प्रसिद्ध झाल्यापासून आलीकडे ब्राह्मण जातीत मुंजीच्या अगोदर आणि शुद्रजातींत लग्नाच्या वयाच्या अगोदर मुलगा दत्तक घेतला असता त्याचे दत्तविधान योग्य वयांतच होऊन यथाशास्त्र झाले असें मानितात. हिंदस्थानच्या या भागांत जिनगर लोक जानवों घालं लागले ही चाल अगदी आलीकडची आहे हे सर्व हल्लीच्या वृद्ध लोकांच्या ऐकण्यांत आहे. काही वर्षांमागे जिनगरांस लोकांत चांभारानमाणे मानीत असत ( त्यांच्या नावा