पान:विधवाविवाह.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ च्या अर्थावरूनही हे सयुक्तिक दिसते ) यास्तव त्यांत कुणबी लोकांच्या हौदांवर अथवा पाणवठ्यावर पाणी भरण्यासही लोकांत हरकत असे. न्हावी लोक त्यांच्या हजामती क. रीत नसत. परंतु आलीकडे त्या गोष्टी प्रचारांत अगदी बंद होऊन जिनगर लोक कुणब्याच्या हौदावर पाणी खुशाल भरूं लागले व न्हावी त्यांच्या हजामती करूं लागले इतकेच नाही; तर जिनगर लोक आपण जानवों घालणारे वरिष्ठ जातीचे लोक आहों व कुणबी हे आपणांपेक्षां कनिष्ठ जातीचे आहेत, असे मानून त्या कुणब्यांच्या हौदांवर पाणी भरण्यास काही से नाखुषही झाले आहेत. सुमारे तीन व पांपूर्वी सातारा शहरांत जिनगर लोकांनी, आमास ब्राह्मणांच्या हौदांवर पाणी भरण्यास परमाणगी द्यावी असा अर्ज केला होता; परंतु तो अमान्य झाला. असो, याप्रमाणे जिनगर लोकांचा वरिष्ठ जातीत येण्याचा प्रयत्न अगदी नवीन असून लोकांस तो बराच मान्य झाला आहे हे दिसतच आहे. आजपावेतों ब्राह्मणजातीखेरीज इतर जातीच्या लोकांम संस्कृत भाषा शिकवण्याची चाल धर्मविरुद्ध अशी मानिली असल्यावरून मुळीच प्रचारांत नव्हती. परंतु आलोकडच्या दहा वर्षांत सरकारच्या मोठाल्या विद्यालयांतून जुने विद्वान शास्त्री लोक ठेवून पाहिजे त्या जातीस संस्कृत शिकविण्याची नवी चाल पडली आहे. ही भाषा दुसज्या जातीस शिकवण्याविषयों,