पान:विधवाविवाह.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ या स्त्रियांच्या पूर्वोक्त दुःखाचा परिहार करण्याचे श्रेय संपादों या विषयों आपलें निष्पक्षपात मत बोला. वरील गोष्टीचा निर्णय करितांना आमच्या देशांतील चाली न बदलणाऱ्या अशा नाहीत हे मात्र तही पके ध्यानात ठेवले पाहिजे. त्यांच्यांत कधीच कांही बदल झाली नाही असे कोणाच्यानेही लणवणार नाही. आणखी उलटें असें आहे की, आपल्या प्रस्तुत काळच्या काही चालो आपल्या पूर्वजांच्या वेळच्या चालींशी लावून पाहिल्या असतां आपण हल्लींचे हिंद लोक त्या पूर्वजांपेक्षा अगदी सर्वांशी नि. राळे आहो असे वाटेल. ही गोष्ट खरी आहे हे समज. ण्यास एक उदाहरण बस आहे. प्राचीन काळी ज्या बैठकीवर ब्राह्मण बसला असेल त्याच बैठकीवर शूद्राने बसणे हा शूद्राचा मोठा अपराध समजत असत. परंतु प्रस्तुत काळी ज्या बैठकीवर शूद्र मोठ्या मानाच्या उंच आसनावर बसतो तिजवरच ब्राह्मण लोक हलक्या चाकरांप्रमाणे खुशाल बसतात.

  • ही चाल शास्त्रविरुद्ध आहे. हल्ली अज्ञान जे ब्राह्मण व शूद्र तेच अशी गोष्ट करतात असे नाही; तर जे ज्ञाते झणन गणले जातात तेही याच चालीप्रमाणे वागतात व त्यांच्या मनांत तिलप्रायही खंती वाटत नाही.

मनने अमें हटले आहे की:सहासनमभिप्रेप्सुरुतकृष्टस्थापकष्टनः। कटयांकृतांको निवास्यः स्फिचं वास्थावकर्तयेत्।। ८.२८१. "ब्राह्मण ज्या आसनावर बसला असेल त्या आसनावर शूद्र वसल्यास त्याच्या कुल्यांवर तापलेल्या लोखंडाने डाग देऊन त्यास हद्दपार करावे अथवा त्याचे कुळे कापून टाकावे."