पान:विधवाविवाह.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४१ अध्याय १२ वा. ( सलग्रंथाचा अध्याय २५ वा.) सिद्धांत. आमच्या या हिंदुस्थान देशांतील अनाथ विधवांस व त्यांतही विशेषतः ज्यांचे प्रिय पति ज्यांस कामादि भयंकर वापदांनी व्याप्त अशा या घोर अरण्यांत अगदी अल्पवयांतच केवळ निराधार टाकून देऊन परलोकात चालते होतात अशांस, ह्मणजे वालविधवांस जो दःखें कंठावी लागतात ती किती आहेत व कशी असह्य आहेत हे ज्यांस नेत्र व कर्ण ही दोन इंद्रिये आहेत ते सर्व खरोखर जाणतील; आणि असल्या सर्व दुःखांचे शांवतन करणारा जो पुनर्विवाह त्याचा अधिकार त्या बिचाऱ्या अनाथ विधवांस दयार्द्रहृदय शास्त्रकर्त्यांनी दिला असून तो त्यांस नाहींसा करण्याचा जो आधुनिक निराधार संप्रदाय त्यापासून लोकांत किती अनर्थापात होत आहेत हेही ते जाणतील. अहो सुज्ञ वाचणारानो, माझी हात जोडून तुम स अशी विनंती आहे की, या विषयाकडे अंतःकरण लावून शांतपणे याचा चां. गला पर्ण विचार करा आणि मग, आपल्या सर्व जनमान्य अशा शास्त्रकत्यांच्या नियमांचा सर्वथा अनादर करून या पुनर्विवाहप्रतिबंधाच्या दुष्ट चालीचे गुलाम होऊनच आपण राहावें; किंवा त्या दुष्ट चालीने आपल्या मानेवर वसवलेलें. ज फेकून देऊन व शास्त्राज्ञेवर भरंवसा ठेवून विधवावि. वाहाचा संप्रदाय आपणामध्ये सुरू करावा आणि त्या विचा