पान:विधवाविवाह.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यावरून साफ दिसते की, रूढी हे अगदी निकृष्ट प्रतीचे प्रमाण आहे आणि वेद व स्मति हाँ वरिष्ठ प्रतीची. प्रमाणे आहेत. न यत्र साक्षाद्विधयो न निषेधाः श्रुतौ स्मृती। देशाचारकुलाचारैस्तत्र धर्मो निरूप्यते॥ " ज्या गोष्टी विषयीं श्रुतींत अथवा स्मतीत विधि व निषेध ही दोन्ही सांगितली नाहीत त्या गोष्टी विषयों देशाचार व कुलाचार हे प्रमाणभत समजावे." यांत स्पष्ट सांगितले आहे की, ज्या गोष्टींविषयी श्रुतिस्मतीमध्ये नियम सांगितले नाहीत त्यांविषयी मात्र कायती रूढि प्रमाण धरावी, इतरांविषयों नाही. आणखों, स्मतेर्वेदविरोधे तु परित्यागो यथा भवेत् । तथैव लौकिकं वाक्य स्मृतिबाधे परित्यजेत् ॥ "स्मति वेदांस विरुद्ध असल्यास ज्याप्रमाणे त्या स्मती चा त्याग करावयाचा त्याप्रमाणेच रूढि ही स्मतीस विरुद्ध असल्यास त्या रूढीचा त्यागच करावयाचा." तेव्हां शास्त्र आणि रूढि यांचा परस्पराशी विरोध आल्यास रूढीचे अनुसरण करू नये. यावरून विधवांच्या विवाहाविषयी शास्त्रांत स्पष्ट आज्ञा दिली असतां, तो देशरूढीस विरुद्ध आहे सबब चाल करूं नये, हे स्थापन करण्याचा प्रयत्न करणे हेच शास्त्रकत्यांच्या मतांस व त्यांच्या नियमांस अगदी धडधडीत विरुद्ध आहे. + स्कंदपुराण. + हो स्मृति प्रयोग पारिजातामध्ये घेतली आहे.