पान:विधवाविवाह.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३९ अध्याय ११ वा. (मूळग्रंथाचा अध्याय २४ वा.) शास्त्रापेक्षां रूढीचे प्रामाण्य बलवत्तर नव्हे. विधवाविवाह शास्त्रसंमत नाही हे स्थापन करण्याकरितां प्रतिपक्षी यांनी प्रमाणभत लणन जों काही वचनें लि. हिली होती त्या सर्वांचा वास्तविक अर्थ व तात्पर्य ही मी यथामति पराकाष्ठेचा विचार करून सांगितली आहेत. आतां स्त्रियांच्या पुनर्विवाहाचा संप्रदाय चाल करण्या विषयों जो एक हरकत प्रतिपक्षी यांनी काढली आहे तिचे निवारण करतो. ते हणतात की, विधवांचा विवाह शास्त्रास अनुसरून असला तरी तो देशाच्या रूढीस विरुद्ध आहे यास्तव तो चालू करूं नये. अशा प्रकारची हरकत कोणी तरी काढील हे जाणूनच वसिष्ठाचे वचन प्रथम भागांत लिहिले आहे त्याचा अर्थ, रूढीपेक्षां शास्त्र हे वलवत्तर प्रमाण होय. परंतु एकच वचन असल्यास तो काही मजबूत आधार नव्हे, असे त्यांचे मत असेलसें वाटते, याकरितां त्याविषयीं दुसरी प्रमाणे लिहितो ती अशी: धर्म जिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुतिः । द्वितीय धर्मशास्त्रंतु तृतीयं लोकसंग्रहः ॥* "धर्म कोणता आहे हे जाणण्याची ज्यांची इच्छा अ. सेल त्यांनी असे समजावे की, श्रुति लणजे वेद हे पहिल्या प्रतीचे प्रमाण, स्मृति झणजे धर्मशास्त्र दुसऱ्या प्रतीचें, आ. णि रूढि मणजे देशाचार हे तिसऱ्या प्रतीचे अशी होत." * महाभारत, अनुशासन पर्व.