पान:विधवाविवाह.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-मनने असे हटले आहे की, पितृभिर्धातभिश्चैताः पतिभिर्देवरैस्तथा । पूज्या भूषयितव्याश्च बहु कल्याणमीप्साभः ॥३.९५ यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ने तत्र देवताः । यत्रतास्तु न पूज्यन्ते सस्तित्राफलाः क्रिया॥३.५६. शोचन्ति जामयो यत्र विनश्यत्याशु तत् कुलम् । न शोचन्ति तु यत्रता बढ़ते तद्धि सर्वदा ॥३.५७. जामयो यानि गेहानि शपन्यप्रातिपनिताः। तानि कृत्याहतानीति विनश्यन्ति समन्ततः॥ ३.५८ "सुख व संपत्ति यांची इच्छा करणाऱ्या पित्यांनी व भ्रात्यांनी, आणि पतीनी व दिरांनी स्त्रियांस सन्मान द्यावा व उत्तम वस्त्रांनी व आभरणांनी त्यांस अलंकृत करावें. ज्या कुटुंबांत स्त्रियांस सन्मान मिळतो त्यांत देवता संतुष्ट अशा होऊन राहतात. परंतु ज्या कुटुंबांत सन्मान मिळत नाही त्यांत यज्ञयाग, तप, दान वगेरे सर्व क्रिया निष्फल होतात. ज्या कुलांत स्त्रिया दुःखित असतात ते कुल लवकर नाश पावते. आणि ज्यांत स्त्रिया सुखी असतात त्यांत सुख व संपत्ति यांची सर्वदा वृद्धि होते. स्त्रियांस योग्य सन्मान न मिळाल्यामुळे त्या ज्या कुलांस शाप देतात. ती सर्वथा नष्ट होतात.” स्त्रियांस सन्मान देण्याविषयों जो हा शास्त्रार्थ वर लि. हिला तो स्त्रियांच्या दुर्भाग्येकरून लोकांत प्रायः अगदी चालत नाही. आणि असा सर्वोत्कृष्ट शास्त्रार्थ मोडल्या मुळे घडणारे जे दुष्ट परिणाम ते लोकांत सर्वत्र धडधडीत दिसतच आहेत.