पान:विधवाविवाह.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३५ थोडासा विचार केला असता असे लक्षात येते की, आमच्या शास्त्रकर्त्यांनी स्त्रिया व पुरुष या दोघांविषयों ही अशा बाबतीत एकसारखेच नियम ठरविले आहेत. ते असेः कन्येचा निश्चय करण्यापूर्वी तिचे कुलशील पाहणे + अविप्लुतब्रह्मचर्यो लक्षण्या स्त्रियमुद्हेत् । अनन्य पार्विकां कान्तामसपिण्डां यवोयसोम्॥५२. अरोगिणी भ्रातमतीमसमानार्षगोत्रनाम् । पंचमात् सक्षमादू_ मातृतः पितृतस्तथा ॥ ५३. दशपूरुषविख्यातात् श्रोत्रियाणां महाकलात् । स्फीतादपि न संचारिरोगदोषसमन्वितात् ॥५४. ऐतैरेव गुणैर्युक्तः सर्वणः श्रोत्रियो वरः । यत्नात् परीक्षित पुंस्त्वे युवा धामान् जनप्रियः॥५५ ब्रह्मचर्य ( झणजे वेदाध्ययन करण्याच्या वेळची स्थिति ) संपल्यावर पुरुषाने अविवाहित, सुलक्षण, मनास आवड णारी, आपल्यापेक्षा वयाने लहान, सपिंडांतली नसलेली, असाध्य रोग नसलेली, भाऊ असलेली, सगोत्र किंवा सप्रवर नसलेली, मातृपक्षाकडून पांच आणि पितृपक्षाकड़न सात याहन अधिक पिढयांची अशी कन्या असेल ती बायको करावी. ज्याची प्रख्याति दहा पिढया आहे, ज्यांत वेदाध्ययन प्रत्यही होत आहे, में मोठं नामांकित व संपत्तिमान आहे, असें कुल असले तरी त्यांत जर संचारी ( झणजे एका पिढीपासून दुस-या पिढीस होणारा असा एखादा ) रोग असला अथवा त्याला दुसरा एखादा कलंक असला तर त्यांतील कन्या करूं नये. जे गुण कन्येच्या अंगी असावे ह्मणून सांगितले तेच गण वराच्या अंगी असले पाहिजेत; तो कन्येच्या जातीचा व प्रत्यही वेदाध्ययन करणारा असा असावा. याखेरीज त्याच्या पुरुषत्वाबद्दल फार बारकाईने चौकशी केलेली असावी आणि तो तरुण, बुद्धिमान व लोकप्रिय असा असावा."