पान:विधवाविवाह.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ या कन्यांच्या विवाहाविषयों ही असाच सिद्धांत केला पाहिजे. वास्तविक रीतीने विचार करतां बिजवराबरोबर लग्न करणे स्त्रीस जसा मध्यम पक्ष, तसाच दुसऱ्या विवाहाच्या बायकोबरोबर लग्न करणे हा पुरुषास मध्यम पक्ष होय. यांत फरक काही नाही. स्मानभाचार्य रघुनंदन याने हाच सिद्धांत केला आहे. तो असा:बौधायनः, श्रतालिने विज्ञाय ब्रह्मचारिणेथने देया । ब्रह्मचारिणे अनातस्त्रीसंपर्कायेति कल्पतरुयाज्ञवल्क्य दीपकालिके । जातस्त्रीसंपर्क स्थ द्वितीयविवाहे विवाहाट कबहिनीवापत्तेस्तदुपादानं प्राशस्त्यार्थमिति तत्वम् ॥ * "बौधायन ह्मणतो-वेदाध्ययनसंपन्न, सद्गुणी आणि ज्ञावा अशा प्रथम वरास कन्या द्यावी. ब्रह्मचारिणे' यांचा अर्थ, कल्पतरु व याज्ञवल्क्यदीपकलिका याग्रंथांत, ज्यास स्त्रीचा संपर्क झाला नाही अशा पुरुषास, असा केला आहे पण हा अर्थ अक्षरशः होतो. आणि हाच घेतला असतां कन्या केवळ प्रथम वरासच द्याव्या असे होईल आणि बिजवराच्या पुनर्विवाहाचा आठ प्रकारच्या विवाहांपैकी एकांत ही समावेश होणार नाही. यास्तव प्रथमवर हे विशेषण देण्याचे बौधायनाचे तात्पर्य हेच की, कन्यादान प्रथम वरा स करणे हा उत्तम पक्ष होय."

  • उद्वाहनस्व.