पान:विधवाविवाह.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जसे आवश्यक आहे तसेच वरास कन्या देण्याचा निश्चय करण्यापूर्वी त्याचे कुलशील पाहणे आवश्यक आहे असा विधि आहे. विवाह झाल्या नंतर नवज्यास संतुष्ट राखणे हा जसा वायकोचा धर्म आहे ह्मणून सांगितले आहे, तसाच वायकोस संतुष्ट राखणे हा नवयाचा धर्म आहे ह्मणन सांगितले आहे. व्यभिचारप्रयुक्त पातक जसे स्त्रीस सांगितले आहे तसेच पुरुषासही सांगितले आहे. एक वायको मेली अथवा वांझ निपजली वगैरे अडचणींच्या प्रसंगी सन्तुष्टो भार्यया भर्ता भत्री भार्या तथैवच । यस्मिन्नेव कुले नित्यं कल्याणं तत्र वै धुवम् ॥ ३.६ ०. " ज्या कुटुंबांत बायको नव-यास संतुष्ट राखते व नवरा बायकोस संतुष्ट राखतो त्याचे निरंतर कल्याण असते." मनु.. यत्रानुकल्यं दंपत्योस्त्रिवर्गस्तत्र वर्धते ॥ १.७४. ज्या कुटुंबामध्ये नवरा बायको परसरास खुष राखतात व परस्पराशी प्रेमाने वागतात त्यांत धर्म, अर्थ, आणि काम हे तीन पुरुषार्थ व. द्धिंगत होतात.” याज्ञवल्क्य. व्युचरंत्याः पति नायर्या अवाप्रभृति पातकम् । भ्रूणहत्यासमं घोरं भविष्यत्यसुखावहम् । भाप्पी तथा व्युचरतः कौमारब्रह्मचारिणीम् । पतिनतामेतदेव भविता पातकं भुवि । "पतीचा अतिक्रम करून व्यभिचार करणाऱ्या स्त्रीस आज पासून श्रण हत्येचें में महाघोर पातक ते लागेल. आणि चांगल्या आचरणाने असणान्या पतिव्रता स्त्रीचा अतिक्रम करून व्यभिचार करणा-या नवज्यासही तेच पातक लागेल." महाभारत, आदिपर्व. अध्याय. १२२.