पान:विधवाविवाह.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३३ स्त्रियांचा पुनर्विवाह करूं नये हे ह्मणणे अगदी विरुद्ध आहे. कारण, प्रतिपक्षी यांचे हे ह्मणणे कबूल केले असतां वर लि. हिलेल्या स्मृतिकयांची आज्ञा असंगत होते. वस्तुतः मागे लिहिलेल्या याज्ञवल्क्य वचनाचा अभिप्राय असा आहे की, पुरुषास नवीन विवाह संबंध करणे असेल तेव्हां त्याने वि वाहित वधूपेक्षा अविवाहित वधूला प्राशस्त्य समजावें; ह्मणजे कन्या द्यावयाची असतां बिजवरापेक्षा प्रथम वर नवरा जसा प्रशस्त तसेच हे ही होय. याज्ञवल्क्यस्मृतीत पुरु. षाने आवेवाहित कन्या वरावी ह्मणून जसे विधान केले आहे तसेंच पुढे लिहिलेल्या बौधायनस्मृतीत कन्यादान प्रथमवरास करावे असे विधान केले आहे. श्रुतशीलिने विज्ञाय ब्रह्मचारिणेथिने देया ॥ वेदाध्ययनसंपन्न सद्णी आणि ज्ञाता अशा प्रथम वरास कन्या द्यावी." यापासून बिजवर नवऱ्यास कन्यादान मुळीच निषिद्ध आहे असे अनुमान काढल्यास तें, बायको मेल्यानंतर, ती वांझ आहे असे समजल्यानंतर अथवा दुसऱ्या कितीएक अ. डचणींच्या प्रसंगों पुरुषास पुनः लग्न करण्यास मोकळीक ज्या स्मतांनी दिली आहे त्यांशी विरुद्ध होईल. हा जो सामान्यतः विरोध दिसतो त्याचा परिहार करण्याकरिता असा सिद्धांत केला पाहिजे की, या स्मात फक्त कमी जास्त प्राशस्त्य दाखविणाया आहेत. अविवाहित व विवाहित + उद्वाहतत्व आणि याज्ञवल्क्यदीपकलिका यांत हे वाक्य घेरले आहे. १२