पान:विधवाविवाह.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ 11. अध्याय १०वा. (मूल ग्रंथाचा अध्याय २3 वा.) विवाहसंबंध करण्याविषयी नवरा जितक्या मानाने बिजवरापेक्षां प्रथमवर चांगला तितक्याच मानाने नवरी द्वितीयविवाहाच्या पेक्षा प्रथमविवाहाची चांगली. विधवाविवाहाविषयींच हा विचार चालला आहे त्यापक्षी अविवाहित कन्येबरोबर विवाह करावा असे पुढे लिहिलेल्या याज्ञवाल्क्य वचनांत लटले आहे त्याचा विचार केला पाहिजे: अविद्युतब्रह्मचर्यो लक्षण्यां स्त्रियमुदत् । अनन्यपूर्विकां कांतामसपिण्डां यवीयसीम् ॥* " ब्रह्मचर्य (ह्मणजे वेदाध्ययन करण्याच्या वेळची स्थिति) संपल्यावर पुरुषाने अविवाहित, सुलक्षण, मनास आवड. णारी, आपणापेक्षा वयाने लहान, आणि सपिंडांतली नव्हे अशा कन्येशी विवाह करावा." - या व याविषयावरील दुसऱ्या वचनांवरून आमचे प्रतिपक्षी विवाहित कन्येचा विवाह पुनः करूं नये, असें स्थापन करण्यास झटतात. परंतु मनु, याज्ञवल्क्य, विष्णु, वसिष्ठ आणि दुसरे स्मतिकर्ते यांनी आपआपल्या संहितांमध्ये कि. तीएक अडचणींच्या प्रसंगी विवाहित स्त्रियांचा पुनर्विवाह करण्याविषयी आज्ञा दिली आहे, त्यांच्या नियमांस विवाहित * याज्ञवाक्य संहिता. १. ५२.