पान:विधवाविवाह.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाहिजे. दुसरे असे की, स्त्रियांच्या दुसऱ्या विवाहास ते लागू पडूं नयेत असे त्या मंत्रांमध्ये कांहींच नाही, तेव्हां तेच लावण्यास हरकत ती कोणती ? पुढे लिहिलेल्या मनुस्मृतीच्या आधारावरून प्रथमविवाहाचे मंत्र स्त्रियांच्या पुनर्विवाहास लागू पडणार नाहीत, असे कितीएक प्रतिपक्षी भांडतात. पाणिग्रहाणका मंत्राः कन्याखेव प्रतिष्ठिताः । नाकन्यासु कचिनृणां लुप्तधर्मक्रिया हि ताः॥८.२२६. , "पाणिग्रहणविधायक मंत्र केवळ कन्यांस ( कन्यांच्या पाणिग्रहणास ) लागू आहेत; " अकन्यांस " हणजे ज्यांचें कन्यात्व नष्ट झाले आहे अशा स्त्रियांस लाग नाहीत. कारण, त्या धर्माचरणापासून बहिष्कृत आहेत." माझें असें ह्मणणे आहे की, वर लिहिलेल्या वचनांत "अकन्या " शब्देंकरून मनूस विधवा विवक्षित नाहीत; तर विवाहापूर्वीच पुरुषसंग होऊन ज्यांचे कन्यात्व नष्ट झाले आहे त्याच विवक्षित आहेत असे, "कारण, त्या धर्माचरणापासन त्या बाहष्कृत आहेत" या शेवटल्या वाक्यावरून अगदी स्पष्ट होते. विधवा धर्माचरणापासून बाहिष्कृत आहेत असे एकाही हिंदूच्या तोंडांतून कधी निघणारच नाही. आणि उलटे असे आहे की, पुनर्विवाह न करितां वैधव्यच पत्करून राहणाऱ्या स्त्रियांस सर्व आयुष्य धर्माच. रणांतच घालविण्यास शास्त्रांत विधान केले आहे.