पान:विधवाविवाह.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० (ह्मणजे जीस पतिस्पर्श झाला नाही) अशा स्त्रीचा पाते मेला असतां तिचा पुनःसंस्कार करावा." विष्णु ह्मणतो: अक्षता भूयः संस्कृता पुनर्भः । अ. १५. "विवाह झाल्यांनतर जी स्त्री पतीने अस्पृष्ट अशी अ. मून पुनः संस्काराप्रत पावते तीस पुनर्भू असें ह्मणतात." याज्ञवल्क्य ह्मणतो:'अक्षता च क्षता चैव पुन ः संस्कृता पुनः । १.६ ७. " विवाह झाल्यानंतर पतीचा स्पर्श झालेली अथवा न झालेली अशी जी स्त्री पुनः संस्काराप्रत पावते तीस पुनर्भू असें ह्मणतात.' तेव्हां ज्याअर्थी मनु, वसिष्ठ, विष्णु, याज्ञववल्क्य, पराशर व दुसरेही किती एक ऋषि इतक्या शास्त्रकर्त्यांनी कांहीं आपत्तींच्या प्रसंगी स्त्रियांस पुनर्विवाहाविषयों अनुमोदन दिले आहे, ज्याअर्थी अशा विवाहास त्यांनी पुनर्विवाहाचा " संस्कार ” असें लटले आहे; ज्याअर्थी संस्कार हा शब्द स्त्रीपुरुषांच्या अमंत्रक अतएव केवळ लौकिक अशा संबंधास मुळीच लावता येत नाही, ज्याअर्थी अशा विवाहापासून झालेली संतति त्यांनी कायदेशीर वारसांत गणिली आहे; आणि ज्याअर्थी अशा द्वितीय विवाह संस्काराबद्दल त्यांनी दुसऱ्या मंत्रांची योजना केली नाही; त्या अर्थी ज्या मंत्रांची योजना पहिल्या विवाहसंस्कारांत होत असते त्यांचीच योजना दसऱ्या विवाह संस्कारांतही केली