पान:विधवाविवाह.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्यास लागू नसतील तर त्या ऋषींनी दिलेली पुनर्विवाहा. ची आज्ञा सर्वथा असंगत होऊं लागेल. स्त्रीपुरुषांच्या केवळ लौकिक संबंधास विवाहसंस्कार लणत नाहीत. तर तो संबंध, विवाहाविषयी विशेष वाचनिक मंत्र आहेत त्यांनी घडला पाहिजे. स्त्रियांचा पुनर्विवाह या शब्दाचा अर्थ, केवळ मंत्र विरहित स्त्रीचा परुषाशी संबंध, असा असता तर त्या संबंधास आमच्या पूर्वोक्त शास्त्रकर्त्यांनी " संस्कार" हा शब्द देखील लाविला नसता. तो असाः र मनु ह्मणतो:या पत्या वा परित्यक्ता विधवा वा स्वयेच्छया। उत्पादयेत् पुनर्मत्वा स पीनभव उच्यते॥९.१७५. सा चेदक्षतयोनिः स्यागतप्रत्यागतापि वा। पौनर्भवेन भत्रों सा पुनः संस्कारमहति ॥ ९.१७६. "विधवा झाल्यानंतर अथवा पतीने टाकून दिल्यानंतर दुसऱ्या पुरुषा बरोबर विवाह होऊन त्या विवाहसंबंधापासन स्त्रीस जो पुत्र होतो त्यास पौनर्भव ह्मणतात. तिला तप्राप्ति झाली नसेल अथवा ऋतुप्राप्तीच्या पूर्वी नवऱ्यापासन जाऊन ऋतुप्राप्तयुत्तर पुनः त्याजकडे परत येईल तर तिचा पुनःसंस्कार केला पाहिजे." वत्तिष्ठ लणतोःपाणिग्रह मते बाला कवलं मंत्रसंस्कृता । साचेदक्षतयोनिः स्थात् पुनः संस्कारमहति ॥अ. १७. "विवाह झाल्यानंतर जिचे कन्यात्व भन्म झाले नाही