पान:विधवाविवाह.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ अध्याय ९ वा. (मूलग्रंथाचा अध्याय २२वा.) ज्या मंत्रांनी प्रथम विवाहविधि करावयाचा त्याच मंत्रांनी द्वितीय विवाहविधि ही करावयाचा. कितीएक प्रतिपक्षी यांचे लणणे असे आहे की, विधवाविवाहरूप संस्कार करण्यास मंत्र नाहीत यास्तव विधवाविवाह करता येत नाही. ही अडचण अगदी अप्रयोजक दिसते. प्रथम विवाहाच्या वेळी ज्या मंत्रांचा ज्या क्रियांकडे विनियोग आहे ते मंत्र दुसऱ्या विवाहाच्या वेळी लावतां येऊ नयेत असे त्या मंत्रांत कांहींच नाही, तेव्हां वरील अडचणीस मुळीच आधार नाही. यास्तव ज्या मंत्रांच्या द्वारा प्रथम विवाहसंबंध सशास्त्रसा होतो त्याच मंत्रांच्या द्वारा द्वितीय विवाहसंबंध ही सशास्त्र झालाच पाहिजे. कांही आपत्तींच्या प्रसंगी स्त्रियांचा पुनर्विवाह करण्याविषयों मनु, विष्णु, वसिष्ठ, याज्ञवल्क्य, पराशर, नारद आणि कात्यायन यांनी आज्ञा दिल्याचे मागें चांगल्या रीतीने सिद्ध केले आहे. प्रथम विवाहास जे मंत्र सांगितले आहेत तेच द्वितीय विवाहास लाग नसते तर वर लिहिलेल्या ऋषींनी त्यास लागू असे निराळे मंत्र खचीत सांगितले असते; कारण, मंत्रांवांचून विवाहसंस्कार पूर्ण होतच नाही. परंतु असे निराळे मंत्र सांगितले नसून पहिल्या विवाहाचे मंत्र दुस.