पान:विधवाविवाह.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२७ अर्जुनस्यात्मजः श्रीमानिरावानाम वीर्यवान् । सुतायां नागराजस्य जातः पार्थेन धीमता ॥ ऐरावतेन सा दत्ता यनपत्या महात्मना । पत्यौहते सुपर्णन कपणा दीनचेतना ॥* ज्याअर्थी मागें सिद्ध केल्याप्रमाण, कन्येचे दान तिजवरच्या मालकीवर नाही, तर ते केवळ विवाहाचे अंग भूत एक कर्म आहे; ज्याअर्थी पुनर्विवाहाच्या प्रसंगी विवाहाचे अंगभूत जे सर्व विधि व संस्कार तत्पूर्वक कन्येचें दान करण्या विषयों शास्त्रांत स्पष्ट आज्ञा सांगितली आहे; आणि ज्याअर्थी विधव्य पावलेल्या कन्येचें दान तिच्या पुनर्विवाहांत वापाने केल्याविषयी स्पष्ट प्रमाण आहे; त्या अर्थी, कन्येचे एकदा दान केले ह्मणजे बापाचे तिजवरील स्वत्व नाहीसे होते. तेव्हां पुनर्विवाहामध्ये दुसऱ्या वेळेस तिचे दान करण्यात बापास अधिकार नाही, ही अडचण अगदी पळपळीत आहे. एकंदरोंत इत्यर्थ असा होतो की, शास्त्राप्रमाणे ज्या पु. रुषांस प्रथम विवाहांत कन्येचें दान करण्याचा अधिकार आहे त्यांतच पुनर्विवाहांत तिचे दान करण्याचा अधिकार आहे.

  • अर्थ ७७ व्या पृष्ठावर पाहावा.