पान:विधवाविवाह.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ चें दान करण्यास बापास काडीमात्र हरकत नाही. मागे लिहिलेल्या स्मतीमध्ये कन्येच्या प्रथम विवाहांत तिचे दान करण्याचा अधिकार लिहिला आहे त्याप्रमाणेच दुसज्यास्मृतीत कितीएक आपत्तींच्या प्रसंगी करावयाच्या पुन. विवाहांतही तिचे दान करण्याचा आधिकार लिहिला आहे. तो असाः सतु यद्यन्यजातीयः पतितः ल्कीबएव च । विकर्मस्थः सगोत्रो वा दासो दीर्घामयोऽपि वा । ऊढापि देया सान्यस्मै सहाभरणभूषणा ॥* पाहा, एकदा विवाह झालेल्या कन्येचे रीतीप्रमाणे पुनः दान करून विवाह करण्याचा अधिकार सांगितला आहे. एकदां कन्येचे दान प्रथम विवाहांत झाले झणजे पुनर्विवाहांत दुसऱ्याानदां तिचे दान होण्यास हरकत असती ता महान् ऋषि जो कात्यायन त्याने नवरा पतित, नपुंसक, सदा रोगी इत्यादि प्रकारचा निपजला असतां तिचं दान दुसऱ्या वरास करण्याविषयों स्पष्ट आज्ञा दिली आहे ती दिली नसती. आणखी या गोष्टीविषयों केवळ आज्ञा आहे इतकेच नाही. तर वैधव्य पावलेल्या कन्येच्या पुनविवाहांत तिचे दान बापाने केल्याविषयी धडधडीत प्रमाणही आहे. ते असें: . * अर्थ 3७ व्या पृष्टावर पाहावा.