पान:विधवाविवाह.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२५ वापाच्या मागून आईलाच अधिकार सांगावयाचा होता. वस्तुतः जमीनजुमला, गुरूंढोर वगैरे पदार्थांवर ज्याप्रकारची मनुष्याची मालकी असते त्याप्रकारची कन्येवर असत. च नाही. जर असती तर पित्याला समजल्यावांचून व त्याच्या अनुमतावांचून त्याच्या कन्येचे दान विवाहांत दुसऱ्या कोणी एखाद्याने केले असते तर ते, तिजवर त्या दान करणाराची काही मालकी नसल्यामुळे निखालस रद्दच झाले असते. परंतु असें खचीत होत नाही. दुसऱ्यांच्या मुलींची कन्यादाने विवाहांत दुसरे लोक करितात अशी उदाहरणें हमेषा घडत असतात. तर ते सर्व विवाह कायम का होतात ? कन्येचा बाप दिवाणी कोटाँत फिर्याद करून ज्या मनुष्याची त्या कन्येवर कांहींच मालकी नाही अशा मनुष्याने केलेले तिचे दान रद का करवीत नाही ? एकाच्या जमीनजुमल्याचे किंवा गुरूढो. राचे दान दुस-याने केले असतां ते कायम होत नाही. दिवाणी कोर्टापुढे फिर्याद केली असतां तें रद्द होते. यास्तव या सर्व गोष्टींवरून कन्येचें दान हणजे केवळ नांवाचे दान आहे आणि ते कन्येवरील मालकीवर मुळीच नाही. याप्रमाणे जर कन्येचे दान तिजवरील मालकविर नाही आणि ते दान केवळ नांवाचे असून शास्त्रकर्त्यांनी ते केवळ विवाहाचे अंगभूत ह्मणून एक कर्म सांगितले आहे; तर शास्त्रांत सांगितलेल्या पतीच्या मरणामुळे अथवा दुसऱ्या आपत्तीमुळे जो पुनर्विवाह करावयाचा त्यांत कन्ये