पान:विधवाविवाह.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पित्याच्या आज्ञेने तिच्या भावाने तिचे दान करावें. मातामहाने ह्मणजे कन्येच्या आईच्या बापाने, मामानें, कन्येच्या बापाच्या गोत्रजानें, अथवा सोययाधायऱ्या संवधी पुरुषाने तिचें दान करावे. यांपैकी कोणीच नसल्यास आई जर नीट शुद्धीवर असेल तर दिने आपल्या कन्येचें दान करावे, परंतु ती शुद्धीवर नसेल तर कन्येच्या जातवाल्यांनी तिचे दान करावे." आतां पाहा, जमीन जुमला वगैरे पदार्थांच्या दाना विषयी जो नियम आहे तोच कन्येच्या दाना विषयों असावा. ह्मणजे तिजवर ज्याचे स्वत्व आहे त्यानेच तिचें दान करावे, असा आमच्या शास्त्रकर्त्यांचा अभिप्राय असता तर क. न्येच्या जातवाल्या लोकांस तिचे दान करण्याचा आधिकार त्यांनी कसा सांगितला असता? तरी कन्येवर कोणाचे तरी स्वत्व आहे असे जर मानिलेच तर फक्त एक तिच्या बापाचे व आईचे मात्र अप्तावे. दुसऱ्या कोणाचे ही तिजवर कोणत्या ही संबंधाने अगदीच स्वत्व नाही. जमीन जुमला वगैरे पदार्थांच्या दानाप्रमाणेच कन्येचे दान ही, ज्याचे तिजवर स्वत्व असेल त्या मनुष्याने करावे असाच नियम असता तर शास्त्रकत्यांनी मातामह (आईकडचा अजा) इत्यादि पुरुषांस तिच्या दानाचा अधिकार सांगितला नसता. आणि तिच्या आईस तिच्या दानाचा अधिकार सांगितला तो सर्व संबंधी जनांच्या मागन सांगितला तो कसा सांगितला असता ? तशा नियमाने पाहता