पान:विधवाविवाह.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२३ आणि अशा पदार्थांच्या दानविक्रयांत व कन्येच्या दानविक्रयांत हा सारखेपणा मुळीच नाही. जमीनजुमल्या वगैरेविषयों असें आहे की, ज्याची त्यांवर मालकी नाही त्यास ते देतां अथवा विकता येत नाहीत. आणि त्याने दिले किंवा विकले तर ते दान अथवा ती विक्री रद होते. परंतु कन्येच्या दानास हा नियम लाग नाही. विवाहांतील कन्येचे दान हे तशा प्रकारचे खरोखर दानच नव्हे. तर हे काही अंशी केवळ नांवाचे दान आहे. विवाहांत कन्या वरास देणे यास आमच्या शास्त्रकर्त्यांनी कन्यादान असें मटले आहे हा विवाह कोणी ही कन्येचें दान केले तरी होतो. आणि ज्या पुरुषाचे त्या कन्येवर अगदी स्वत्व नाही त्याने तिचे दान केले असतां ही, ज्याचे तिजवर पूर्ण स्वत्व आहे असे मानतात त्याने दान केल्या प्रमाणेच होऊन तो विवाह अगदी पुरा व कायम होतो. दुसऱ्या पदार्थांविषयों पाहिले असतां ज्या पदार्थावर ज्या मनुष्याचे खत्व नाही त्या पदार्थाचे दान त्या पुरुषाच्या हातून होत नाही. आणि कन्येचे दान केवळ स्वजातीच्या मनुष्यापासून ही होते. ते असेःपिता दद्यात् स्वयं कन्यां माता वानुमतः पितुः । मातामहो मातुलश्च सकुल्यो बान्धवस्तथा ॥ माता त्वभावे सर्वेषां प्रकृती यदि वर्तते । तस्यामप्रकृतिस्थायां कन्यां ददुः स्वजातयः ॥ * "कन्येचे दान स्वतः तिच्या पित्याने करावे. किंवा * उद्वाहतत्वामध्ये नारदसंहितेतील उतारा आहे.