पान:विधवाविवाह.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ अध्याय ८ वा. (मलग्रंथांतील अध्याय २० वा.) वैधव्य पावलेल्या कन्येचे दान दुसऱ्या वरास तिच्या पित्याने करावे. काही लोकांनी अशी अडचण काढली आहे की, “वि. धवाविवाहांत विधवेचे दान ( कन्यादान ) कोणी करावे ? बापाने एक वेळ एका वरास कन्येचे दान केले ह्मणजे लागलेच तिजवरील त्याचे स्वत्व अगदी संपते. मग ति. जवर त्याची बिलकूल मालकी नाही, तेव्हां तो ती दुसऱ्या वरास कसा देऊ शकेल ?" । आमच्या देशांत विवाहाचे हल्ली दोन प्रकार चाल आहेत, एक ब्राह्म आणि दुसरा आसुर, हणजे एक कन्येचे दान आणि दुसरा तिचा विक्रय, “दान" व "विक्रय " या शब्दांचे दुसऱ्या सर्व ठिकाणी जे अर्थ असतात तेच केवळ या ठिकाणी नाहीत. सामान्यतः पाहिले असतां ज्या वस्तूवर ज्याचे स्वत्व हणजे मालकी आहे तोच तिचे दान अथवा विक्रय करूं शकतो; आणि एकवार त्याने त्या वस्त, दान अथवा विक्रय केला ह्मणजे त्याची तिजवरील मालकी नाहीशी होते आणि अर्थात तिचे दान अथवा विक्रय त्यास पुनः करता येत नाही. हा निर्बंध अनादिकालापासून जमीनजुमला, घरदार, वस्त्रपात्र, गुरूंढोरे इत्यादिकांच्या दानाविषयी व विक्रयाविषयींच लागू आहे.