पान:विधवाविवाह.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कलियुगांतले धर्म नव्हेत. परंतु हे त्यावचनाच्या अर्थात अगदी सर्वथा विरुद्ध आहे. यास्तव त्या स्मृतीचा वास्तविक अर्थ असा आहे की, तपश्चर्या इत्यादि धर्म सामान्यतः सर्वच युगांतले आहेत, आणि त्या त्या युगांत तो तो धर्म मुख्य आहे इतकेंच. पूर्वोक्त स्मृतीतील "पर" आणि "एक" हे शब्द तपश्चर्यादिक विशेष्यवाचक शब्दांची विशेषणे आहेत. या दोन्ही विशेषणांचा अर्थ का " मुख्य " असा होतो व कधी " एकच " असा होतो. आणि मला असे वाटते की, आमच्या प्रतिपक्षांनी त्या शब्दांचा दुसरा अर्थ घेतला आणि वर लिहिल्या प्रमाणे अशुद्ध व्याख्यान केले. परंतु या स्मतीत या दोन्ही शब्दांचा अर्थ मुख्य असा आहे, एकच असा नव्हे. कुंलुक भट्टाच्या व्याख्येवरूनही असेंच दिसते. ते असे: यद्यपि तपःप्रभूतानि सर्वाणि सर्वयुगेष्वन यानि तथापि सत्ययुगे तपः प्रधानं महाफलमिति ज्ञाप्यते, एवमात्मज्ञानं त्रेतायुगे, द्वापरे यज्ञः, दानं कलौ । "तपश्चर्यादिक धर्म असे आहेत की, ते सर्वच प्रत्येक यगांत आचरावयाचे आहेत तरी, तपश्चर्या सत्ययुगांत मुख्य धर्म आहे, मगजे सत्ययुगांत तपश्चर्या विशेष फल प्रद आहे; या प्रमाणेच ईश्वरीय ज्ञान त्रेतायुगांत, यज्ञ याग द्वापारयुगांत आणि दान कलियुगांत, हे मुख्य धर्म आहेत.