पान:विधवाविवाह.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्म ईश्वरीय ज्ञान, द्वापार युगांतील मुख्य धर्म यज्ञयाग आणि कलियुगांतील मुख्यधर्म दान या प्रमाणे मटले आहे." आतां भिन्न भिन्न युगांत भिन्न भिन्न धर्म आहेत असे पूर्वीच्या स्मृतीत सांगून तिच्याच पुढच्या स्मृतीत ते भिन्न भिन्न धर्म मनूने सांगितले आहेत किंवा काय याचा निकाल आमच्या वाचणारांनी करावा. पूर्वीच्या स्मृतीत भिन भिन्न युगांतले धर्म भिन्न भिन्न आहेत असे सांगून पुढच्या स्मृतीत प्रत्येक युगांतील मुख्य मुख्य धर्म मात्र सांगितले आहेत. पूर्वांच्या स्मृतीत जे भिन्न धर्म आहेत ह्मणून सांगितले आहेत तेच पुढच्या स्मृतीत सांगितले आहेत असे दिसत नाही. प्रत्येक युगांतला मुख्य धर्म सांगितला ह्मणजे प्रत्येक युगांतील सर्व धर्म सांगितले असे होत नाही. या शिवाय पूर्वीच्यास्मतीत धर्म शब्दाचे "धर्माः" असे बहुवचन आहे. त्याचा अर्थ प्रत्येक युगांतील " सर्व धर्म " असा आहे. तेव्हां प्रत्येक युगांतला एक एक मुख्य धर्म सांगितला ह्मणजे तेवघ्यावरूनच त्या युगांतले सर्वच धर्म सांगितले असे कसे ह्मणतां येईल ? यास्तव पुढच्याच स्मृतीत भिन्न भिन्न युगांतील भिन्न भिन्न धर्म मनूने सांगितले आहेत हे मणणे अगदीच पळपळीत आहे. माझ्या प्रतिपक्ष्यांनी "कलियुगांतला धर्म फक्त दान करणे हाच होय" असे मागे हटले आहे. त्यावरून असे होते की, उपोषण, भजन, देवाचे पूजनार्चन, यात्रा इत्यादि