पान:विधवाविवाह.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांगितले आहेत असे त्यांस खास वाटते. आणि त्यावरून मग अर्थात "मनुसंहितेत निरनिराळ्या युगाचे निरनिराळे धर्म सांगितले नाहीत" असे जे मी लिहिले तो केवळ प्रमादच होय असा त्यांनी सिद्धांत केला. यावर माझें ह्मणणे असे आहे की, हा त्यांचा सिद्धांत सर्वथा युक्तिविरुद्ध आहे. याविषयों बारीक रीतीने विचार केला असता असे साफ दिसते की, निरनिराळ्या युगांत निरनिराळे धर्म आहेत असे पूर्वीच्या स्मतीत लिहितांना जे विशेष धर्म मनस विवाक्षित आहेत तेच त्याने पुढच्या स्मृतीत सांगितले आहेत, हे आमच्या प्रतिपक्ष्यांचे ह्मणणे काही केले तरी त्यांस कधीही सिद्ध करता येणार नाही. आणखी दुसरे असे की, पुढच्या स्मृतीचा त्यांनी जो अर्थ केला आहे तो बरोबर नाही. यास्तव वाचणारांस या गोष्टीचा निर्णय करितां यावा ह्मणून दोन्ही स्मति त्यांच्या वास्तविक अर्थासहित खाली लिहितो. अन्ये कृतयुगे धर्मा स्त्रेतायां द्वापरे परे । अन्ये कलियुगे नृणां युगव्हासानुरूपतः।" कृतयुगापासून कलियुगापर्यंत मनुष्याची शक्ति कमी कमी होत जति; तिच्या प्रमाणाने कृतयुगांतले धर्म निराळे, त्रेतायुगांतले निराळे, द्वापारयुगांतले निराळे आणि कलियुगांतले निराळे." तपः परं कृतयुगे त्रेतायां ज्ञानमुच्यते । द्वापरे यज्ञमित्याहुनिमेकं कलौ युगे ॥ " सत्ययुगांतील मुख्य धर्म तपश्चर्या, त्रेतायुगांतील मुख्य.