पान:विधवाविवाह.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ तर आतां कलियुगांतल्या लोकांनी धर्म कोणते आचरावे? मनूने फक्त निरनिराळ्या युगांत निरनिराळे धर्म आहेत इतकेंच सांगितले आहे. पण ते निरनिराळे धर्म कोणते ते सांगितले नाहीत. तो विवेक फक्त पराशर संहितेत केलेला आढळतो. हा लेख कितीएक प्रतिपक्ष्यांस बरा न वाटून त्यांनी मला उद्देशून असे लिहिले आहे की, " निरनिराळ्या युगां. त आचरावयाचे निरनिराळे धर्म मनुस्मृतीत पार्थक्य करून सांगितले नाहीत असे हा ( मी) कोणत्या आधारावरून ह्मणतो. 'मनुष्याच्या शक्तीचा युगपरत्वे करून व्हास होतो इ० अथाचे एक फुटकळ वाक्य पाहूनच याने आपले दोन्ही डोळे घट्ट मिटून घेतले ह्मणावे काय ? याने स्वतः लिहिलेल्या स्मृतीच्या पुढच्याच स्मृतीत, कोणत्या युगांत कोणते धर्म करावयाचे ते मनूने सांगितले आहेत; पण ती स्मृति याने कशी ती मुळीच पाहिली नाही. तपः परं कृतयुगे त्रेतायां ज्ञानमुच्यते । द्वापरे यज्ञमित्याहुनिमेकं कलौ युगे ॥ 'सत्य युगांतील धर्म तपश्चर्या, त्रेतायुगांतील धर्म ईश्वरीय ज्ञान, द्वापारयुगांतील धर्म यज्ञ आणि कलियुगांतील धर्म फक्त दान या प्रमाणे मटले आहे." आमच्या प्रतिपक्ष्यांच्या या वरील मणण्यांतला अभिप्राय असा दिसतो की, मनने, “अन्येकृतयुगेधर्माः" या स्मृतीमध्ये निरनिराळ्या युगांत निरनिराळे धर्म आहेत असे सांगून तिच्याच पुढच्या स्मृतीमध्ये ते निरनिराळे धर्म कोणते ते त्याने