पान:विधवाविवाह.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मच सांगितले आहेत असे नाही; तर इतर युगांतील धर्मही सांगितले आहेत; तेव्हां पराशरसंहिता फक्त कालि. युगांत आचरावयाच्या धर्माचीच प्रतिपादक नव्हे, असा सिद्धांत करणे कोणत्याही प्रकारे सयुक्तिक नव्हे. तर ती केवळ कलिधर्मप्रतिपादकच आहे. अध्याय ७वा. (मूळ ग्रंथांतील अध्याय १५वा.) मनुसंहितेत चार युगांतील निरनिराळ्या धर्माचें पार्थक्याने विवेचन केले नाही. पहिल्या भागामध्ये, धर्मशास्त्र करून ग्राह्य असे ग्रंथ कोणते या गोष्टीचा याज्ञवल्क्याच्या मताप्रमाणे विचार करितांना मी लिहिले आहे ते असे:-सर्व धर्मशास्त्रांत सांगितलेले धर्म सर्व युगांत आचरावे किंवा युगभेदेकरून त्यांची काही व्यवस्था आहे, या विषयों मनुस्मृति पुढे लिहिल्या प्रमाणे आहे: अन्येकृतयुगे धर्मात्रेतायां द्वापर परे। अन्येकलियुगे नृणां युगव्हासानुरूपतः । " कृतयुगापासून कलियुगापर्यंत मनुष्याची शक्ति कमी कमी होत जाते; तिच्या प्रमाणाने कृतयुगांतले धर्म निराळे, त्रेतायुगांतले निराळे, द्वापारयुगांतले निराळे आणि कलियुगांतले निराळे."