पान:विधवाविवाह.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लें अन घरी आणण्याविषयी आगरा याने पुनः असें लटले आहे की, 'कोठनही पाणी आले तरी नदीस मिळालें हणजे शुद्ध होते तसेच शूद्राच्या घरचें न शिजवलेले अन्न ब्राह्मणाच्या घरांत आले झणजे लागलेच शुद्ध होते। पराशराने झटले आहे की, शूद्रान्न ब्राह्मणाच्या घरांत आले तरी ब्राह्मणाने त्याचा स्वीकार केल्या नंतरच ते शुद्ध होते. ते असें, 'ब्राह्मण त्याच्या अन्नाचा स्वीकार करीपर्यंत ते शूद्रानच राहते, त्याच्या हस्तस्पर्शाने ते पवित्र होते. विष्णुपुराणांत असे हटले आहे की, शूद्रानाचा स्वीकार करणे तो तें धुवून अथवा प्रोक्षण करून मग करावा. ते असें, 'शूद्राल कोणा एखाद्याच्या घरी आले असतां तें पोसून मग स्वीकारावे.' अंगिरायाने असे झटले आहे की, गदान ज्या पात्रांत आणले असेल त्याहून निराळ्या पात्रांत घालून ते घ्यावे. ते असें, 'शूद्राने दूध अथवा दहीं आपल्या भांड्यात घालून कोणाएखाद्याच्या घरी आणून त्यास फुकट दिले असतां घेणाराने ते दुसऱ्या भांड्यात घालून ध्यावे.' या पदार्थांपैकी जे द्विजाच्या घरी येतात तेच शुद्ध आणि शूद्राच्या घरी असल्यास तेच शूद्रान ह्मणून अशुद्धच होत, असे यावरून सिद्ध होते." या सर्व विचारांवरून असे उघड सिद्ध होते की, अश्वमेधादिकृत्ये कलियुगांतील धर्म नाहीत हा जो निर्मूल ग्रह तो दृढ धरून त्यावरून, ज्या अर्थी हे कलिवयं धर्म पराशरसंहितेत सांगितले आहेत त्याअर्थी पराशराने केवळ कलि.