पान:विधवाविवाह.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ दित्य पुराणांत शेंद्रांपैकी दास, नापित, इत्यादिकांचे अन्न खाण्याचा निषेध सांगून लागलाच ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांचे अन्न शूद्राने शिजवण्याचा निषेध सांगितला आहे तो सांगितला नसता. एका मागून एक सांगितलेल्या दोन निषेधांपैकी दुसरा निषेध शूद्राने अन्न शिजविण्याविषयोंच स्पष्ट आहे तेव्हां पहिला निषेध अर्थात न शिजवलेल्या अन्नाविषयींच आहे हे अगदी उघड आहे. दुसरे असे आहे की, शूद्राचे तांदूळ वगैरे धान्य हैं शास्त्रांत शूद्रान्नच मानिले आहे. ते असे: आमं शूद्रस्य पक्वान्नं पक्कमच्छिष्टमच्यते ।। "शूद्राचे न शिजवलेले धान्य शिजवल्या प्रमाणे होय आणि शिजवलेले अन्न उच्छिष्ट अन्नाप्रमाणे होय." मागे शूद्रान्न या शब्दाचा जो अर्थ केला आहे तोच. स्मार्त्तभट्टाचार्य रघुनंदन याचा त्या विषयावर ग्रंथ आहे त्यावरूनही कायम होतो. तो असाःआममन्नं दत्तमपि भोजनकाले तदहावस्थितं शद्वान्नं । तथाचांगितः * शूद्रेषु दासगोपालकुलामत्रार्द्ध सीरिणाम् । भोज्यान्नता गृहस्थस्य तीर्थसेवातिदूरतः ।। ब्राह्मणादिषुशूद्रस्यपकप्तादिक्रियापिच । "गृहस्थाश्रमी द्विजानें, शूद्रांपैकी दास, गोपाल, कुलमित्र आणि अर्धसीरी या जातींनी दिलेले अन्न खाणे; दूरची तीर्थ यात्रा करणे ब्राह्मणाचें अन्न शूद्राने शिजवणे;" (या गोष्टी कलियुगांत निषिद्ध आहेत.) + तिथितत्व. दुर्गापूजा तत्व,